श्री सदगुरु धोंडीराज निवासी अंध विद्यालय, पलूस ही एक नामांकित विशेष शिक्षण संस्था असून तिची स्थापना सन 2006 मध्ये करण्यात आली आहे. या संस्थेस सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग तसेच समाज कल्याण विभाग, सांगली यांची अधिकृत मान्यता प्राप्त आहे.
ही शाळा अनुदान तत्त्वावर कार्यरत असून अंध विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे. संस्थेचे मुख्य उद्दिष्ट अंध विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनवणे, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणे आणि त्यांच्या कला, कौशल्य व सुप्त गुणांना वाव देणे हे आहे.
आमच्या शाळेत विद्यार्थ्यांची सर्वांगीण शैक्षणिक प्रगती घडवून आणली जाते. त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण, कौशल्य प्रशिक्षण व मार्गदर्शन देऊन नोकरीच्या संधींसाठी सक्षम केले जाते. समाजात सन्मानाने जीवन जगता यावे यासाठी विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर बनवणे, स्वावलंबनाची भावना निर्माण करणे तसेच उदरनिर्वाहासाठी आवश्यक कौशल्यांना प्रोत्साहन देणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे.
पुढे वाचा
सुसज्ज व सुरक्षित इमारत.
ब्रेल लिपी प्रशिक्षित शिक्षक.
विद्यार्थी शिक्षक प्रमाण 10:1.
मुलांना गायन वादन प्रशिक्षक.
मुलांची काळजी घेण्यासाठी काळजीवाहक
मोबेलिटी प्रशिक्षक.
पोषक, स्वच्छ आणि संतुलित आहार.
सीसीटीव्ही व वायफाय सुविधा.
मुला मुलींना स्वतंत्र वसतिगृह.
मुलांना खेळण्यासाठी क्रीडांगण व खेळायचे साहित्य उपलब्ध आहे
शीघ्र हस्तक्षेप वर्ग.
हस्तकला प्रशिक्षण, योगासन ,प्राणायाम मार्गदर्शन.
आंघोळीसाठी गरम पाण्याची सोय.
मुलांच्या औषध उपचारासाठी नर्स.
मुला मुलींसाठी स्वतंत्र संडास, बाथरूमची सोय
विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेनुसार तज्ञांकडून तपासणी केली जाते आणि आवश्यक कागदपत्रांसह प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली जाते.